वृत्तसंस्था/ म्युनिच
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या म्युनिच खुल्या क्लेकोर्ट पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या टॉप सीडेड ऍलेक्झांडर व्हेरेव्हचे आव्हान उपांत्यपूर्वफेरीत संपुष्टात आले. बेलारूसच्या इव्हासेकाने त्याचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात बेलारूसच्या इव्हासेकाने व्हेरेव्हचा 7-6 (5-7), 7-5, 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. व्हेरेव्हने 2017 आणि 2018 साली या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. दुसऱया एका सामन्यात जर्मनीच्या स्ट्रफने क्रेजिनोव्हीकचा तीन तासांच्या कालावधीत 6-4, 4-6, 7-6 (7-3) असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. इव्हासेका आणि स्ट्रफ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. पावसामुळे शुक्रवारी या स्पर्धेतील काही सामने थांबविण्यात आले होते.