टीटीडीएस संस्थेचे बंदर विभागाला निवेदन
वार्ताहर / मालवण:
तारकर्ली येथील टीटीडीएस संस्थेच्या पदाधिकाऱयांनी जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्यांचे निवेदन बंदर अधिकारी सुषमा कुमठेकर यांच्याकडे दिले. पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात यावा, अशी मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे. बंदर विभागाने पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्या व समस्यांची त्वरित दखल घेऊन वरि÷ कार्यालयाला प्रस्ताव सादर केल्याची माहिती टीटीडीएस अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली. यावेळी रवींद्र खानविलकर, मिलिंद झाड, दादा वेंगुर्लेकर, राजन कुमठेकर, मनोज खोबरेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
कोरोनामुळे वर्षभर ओखी, क्मयार, निसर्ग वादळाने संकटात असलेला किल्ला वाहतूक, बोटिंग, वॉटरस्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग, जलपर्यटन व्यावसायिक प्रचंड आर्थिक मेटाकुटीस आला आहे. हा व्यवसाय उभा राहण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. गेल्या वषीचा पूर्ण व्यवसाय बंद असल्याने या वर्षाची नौका सर्वेक्षण फी माफ करावी. इन्शुरन्स हा व्यावसायिकांकडून न स्वीकारता ज्यावेळी बंदर विभाग प्रत्येक जलक्रीडा करताना पर्यटकांकडून कर आकारतो. त्याचवेळी रेल्वे, बीईएसटी, एसटी अन्य विभागाप्रमाणे हा इन्शुरन्स प्रतिपर्यटकांकडून आकारावा. लेव्ही कर या वषी माफ करावा. प्रति व्यक्ति 1 लाख असलेला इन्शुरन्स वाढवून प्रति व्यक्ती 5 लाख करण्यात आला, तो पूर्ववत 1 लाख करावा. प्रशासनाने सर्व जलक्रीडा व्यावसायायिकांची एकत्र बैठक घेऊन त्यांना मंजूर प्रवासी क्षमतेच्या किती टक्के प्रवासी वाहतूक करावी, या संबंधी चर्चा करून शासनाने अधिकृत परिपत्रक जाहीर करावे. व्यवसाय सुरू करताना आवश्यक कोविड सुरक्षा किट शासनामार्फत मोफत देण्यात यावे. स्थानिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांना मान्यता द्यावी. या वर्षीचा पर्यटन हंगाम व्यवस्थित न झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्यात यावी. अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.