वृत्तसंस्था/ गुवाहाटी
खेलो इंडिया युथ गेम्सच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणातही सुवर्णपदकांची लयलूट कायम राखली. अपेक्षा फर्नांडिसने 17 वर्षाखालील गटात 400 मीटर्स वैयक्तिक मिडले शर्यत 5 मिनिटे 12.19 सेकंद अशा विक्रमी वेळेत पार केली. यापूर्वी तिने गतवषी 5 मिनिटे 13 सेकंद असा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. ती मुंबई येथे मोहन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याच वयोगटात गतवषी पुण्यातील स्पर्धा गाजविणाऱया केनिशा गुप्ता हिने येथे 100 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीचे सुवर्णपदक पटकाविले. हे अंतर तिने 59.14 सेकंदांत पूर्ण केले.
मुलांच्या 21 वर्षाखालील गटात मिहिर आम्ब्रेने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याने 100 मीटर्स बटरफ्लाय शर्यत 54.91 सेकंदांमध्ये जिंकली. पाठोपाठ त्याने आपल्या संघास 4 बाय 100 मीटर्स मिडले रिलेमध्येही विजेतेपद मिळवून दिले. मिहिर आम्बे, सुचित पाटील, रुद्राक्ष मिश्रा व एरॉन फर्नान्डसि यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने ही शर्यत 3 मिनिटे 56.83 सेकंदांत पार केली. 17 वर्षाखालील गटात मात्र महाराष्ट्रास या शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी हे अंतर 4 मिनिटे 4.73 सेकंदांत पूर्ण केले.
मुलांच्या 21 वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या एरॉन फर्नान्डीस व सुश्रुत कापसे यांनी 400 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळविले. मुलींच्या 21 वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा तळेगावकर (19 मिनिटे 21.73 सेकंद) व मैत्रेयानी भोसले (20 मिनिटे 34.70 सेकंद) यांनी 1500 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक पटकाविले.
वेटलिफ्टींगमध्ये प्राजक्ता, किरण व अभिषेकला सुवर्ण
वेटलिफ्टींगमध्ये महाराष्ट्राच्या प्राजक्ता खालकर हिने कनि÷ विभागातील 64 किलो गटात सुवर्णपदक पटकाविले. तिने स्नॅचमध्ये 81 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 100 किलो असे एकूण 181 किलो वजन उचलले. कनि÷ मुलांच्या 73 किलो गटांत महाराष्ट्राच्या अभिषेक निपणे याने सोनेरी कामगिरी केली. त्याने स्नॅचमध्ये 114 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 154 किलो असे एकूण 268 किलो वजन उचलले. त्याचाच सहकारी गणेश बायकर याला याच गटात कांस्यपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये 105 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 140 किलो असे एकूण 245 किलो वजन उचलले. युवा विभागाच्या 73 किलो गटात महाराष्ट्राचा किरण मराठे हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने स्नॅचमध्ये 111 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 140 किलो असे एकूण 251 किलो वजन उचलले. तो जळगाव येथे योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.