प्रतिनिधी /बेळगाव
रविवारी अनगोळ परिसरात जलद कृती दलाच्या जवानांनी (रॅपिड ऍक्शन फोर्स) पथसंचलन केले. स्थानिक पोलिसांनी त्यांना साथ दिली. सध्या जलद कृती दलाची एक तुकडी बेळगावात असून रोज वेगवेगळय़ा भागात त्यांचे पथसंचलन सुरू आहे.
टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे आदी अधिकाऱयांनी जलद कृती दलाच्या जवानांना साथ दिली. अनगोळ येथील शाळा क्र. 34 पासून पथसंचलनाला सुरुवात झाली. धर्मवीर संभाजी चौक, राजहंस गल्ली, आंबेडकर गल्ली, झेरे गल्ली, मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली, महात्मा गांधी स्मारक, वाडा कंपाऊंड, रघुनाथ पेठ, मुस्लीम गल्ली, झटपट कॉलनी येथून चिदंबरनगर येथील चिदंबरेश्वर मंदिरापर्यंत येऊन पथसंचलनाची सांगता झाली.
दोन दिवसांपूर्वी या तुकडीने शहराच्या मध्यवर्ती भागात पथसंचलन केले होते. मार्केट व खडेबाजार पोलीस स्थानकांना भेटी देऊन माहिती घेतली होती. यासंबंधी पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधला असता आणीबाणीच्यावेळी अनुकूल ठरण्यासाठी या तुकडीतील जवान वेगवेगळय़ा शहरांना भेटी देऊन पाहणी करतात. या पाहणीचा एक भाग म्हणून सध्या एक तुकडी बेळगावात आहे. या पथकाने वेगवेगळय़ा परिसरात पथसंचलन करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली.