खासदार उदयनराजेंच्या हस्ते विधीवत पूजन
प्रतिनिधी/ सातारा
तुताऱयाच्या निनादात, शिवमय वातावरणात राजधानी साताऱयात 348 वा शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. विशेष करुन जलमंदिर पॅलेस येथे सकाळपासून वातावरण शाही झाले होते. पुरोहितांच्या मंत्रोच्चारामध्ये खासदार उदयनराजेंच्या हस्ते छत्रपती शिवप्रभूंचा शिवराज्यभिषेक करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजेंचे कट्टर समर्थकांची जलमंदिर पॅलेस येथे हजेरी होती. दरम्यान, सकाळी त्यांनी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
राजधानी साताऱयात जलमंदिर पॅलेस येथे सकाळपासूनच मंगलमय वातावरण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या परिसर फुलांनी सजवला होता. तुताऱयांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीच्या गजरात खासदार उदयनराजेंचे पुजेच्या ठिकाणी आगमन झाले. पुरोहिताच्या उपस्थितीत ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हणून शिवराज्यभिषेक सोहळयाला प्रारंभ झाला. विधीवत पद्धतीने खासदार उदयनराजेंच्या हस्ते पूजन करण्यात आले. सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तत्पूर्वी सकाळी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयात खासदार उदयनराजे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले होते.