प्रतिनिधी /बेळगाव
हिडकल पाठोपाठ हिंडलगा जलवाहिनीला गळती लागल्याने मंगळवारी शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. गळती दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठा योजनेसह शहरातील पाणीपुरवठा बुधवारी देखील बंद राहणार आहे.
हिडकल जलवाहिनीला गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तसेच हिंडलगा पंपिंग स्टेशन ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. पण काही ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता मंगळवारी दिवसभर शहराचा पाणीपुरवठा बंद झाला होता. अचानक पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तसेच पाणी समस्या निर्माण झाली. बुधवारी देखील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती एल ऍण्ड टी कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे. 24 तास योजनेतील काही भागाचा पाणीपुरवठा देखील बंद राहणार आहे.