विद्या बालन-शेफाली शाह यांची जोडी दिसणार
अभिनेत्री विद्या बालन आणि ‘तुम्हारी सुलु’चे दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी पुन्हा एकदा एका चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. जलसा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रोमांच आणि सूडाच्या भावनेवर आधारित हा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विद्या बालन आणि शेफाली शाह यांची जोडी दिसून येत आहे. या चित्रपटाची कथा हिट अँड रन रस्ते दुर्घटनेवर बेतलेली असल्याचे समजते.
या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, शिखा शर्मा आणि सुरेश त्रिवेणी करत आहेत. जलसामध्ये विद्या बालन तसेच शेफाली शाह यांच्यासोबत मानव कौल, रोहिणी हट्टंगडी, इक्बाल खान, विधात्री बंदी, श्रीकांत यादव, सूर्या काशीभटला आणि शफीन पटेल यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट 18 मार्च रोजी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
नवी कहाणी सांगण्याचा आणि आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळे काही तरी करण्याचा माझा प्रयत्न असतो. जलसामध्ये या सर्व गोष्टी सामील आहेत. या चित्रपटात एक पत्रकाराच्या भूमिकेत आहे. एक कलाकार म्हणून माझ्यासाठी हे आव्हानात्मक राहिले आहे. शेफाली शाहसोबत काम करणे माझ्यासाठी एक चांगला अनुभव राहिला असल्याचे विद्याने म्हटले आहे.