बेळगाव /प्रतिनिधी
कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबापासून सात ते आठ महिने वेगळे राहून रुग्णांची सेवा केल्याबद्दल जलाराम फौंडेशनच्यावतीने बिम्स हॉस्पिटलमधील कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी जलाराम फौंडेशनच्यावतीने श्री संत जलाराम यांची पूजा करून प्रसादाचे वाटप केले. त्यानंतर महांतेश निलकेरी यांनी फौंडेशनचे अध्यक्ष कनुभाई ठक्कर यांचे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या सहकाऱयांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
यावेळी फौंडेशनच्यावतीने बिम्समधील सर्व डॉक्टर, नर्स, परिचारिकेचा फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर कोरोना वॉरियर्स म्हणून हिना भाटिया, वीणा एकबोटे, फरीदा कुन्नीबरी, आर. एस. हिरेमठ, पंचाक्षरी आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी जलाराम फौंडेशनचे बिपिन भाई सोमय्या, ललितभाई शाह, मनीष राछ, मिलिंद ठक्कर, प्रकाश कुलकर्णी, प्रशांत गयी, दीपेन ठक्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.