प्रतिनिधी/ बेळगाव
जलाराम फौंडेशनच्यावतीने विराबाई माँ पुण्यतिथीनिमित्त बेळगाव शहरात रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱया गोळय़ांचे वितरण करण्यात आले. कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते 3 हजार पाकिटांचे वाटप करण्यात आले.
नुकतेच खडेबाजार येथील मारुती मंदिर तसेच नरगुंदकर भावे चौक येथे या औषधाचे वितरण करण्यात आले. जलाराम फौंडेशनचे अध्यक्ष कन्नुभाई ठक्कर म्हणाले, सध्या सर्वत्र कोरोनाची भीती असल्याने आम्ही नागरिकांच्या आरोग्यासाठी औषधांचे वितरण करत आहे. यावेळी कृष्णा भट्ट, भगवानदास कपाडिया, मुकेश खोडा, विजया पोरवाल आदी उपस्थित होते.