स्वागत समारंभ आटोपून परतताना काळाचा घाला
जळगाव / प्रतिनिधी
लग्नाच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आटोपून घराकडे परतत असताना समोरून भरधाव येणाऱया डंपरने प्रुझरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 10 जण जागीच ठार झाले, तर 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात यावल तालुक्मयातील हिंगोणा गावाजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. वऱहाडावर काळाने घाला घातल्याने चिंचोल, निंबोल आणि चांगदेव गावामध्ये शोककळा पसरली आहे.
स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर चोपडा येथून चिंचोल, चांगदेव तसेच निंबोल येथील वऱहाडी कुटुंबीय पुझरने गाडीतून घराकडे निघाले होते. त्यावेळी समोरून राखेने भरलेला डंपर महामार्गावरून भरधाव जात असताना त्या डंपरने यावल तालुक्मयातील हिंगोणा गावाजवळ प्रुझरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की क्रूझरमधील 17 पैकी 10 जण जागीच ठार झाले. हिंगोणा गावाजवळ मोठा अपघात झाल्याची माहिती कळताच हिंगोणा ग्रामस्थांसह पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, जिजाबराव पाटील, रोहिदास ठोंबरे व सहकारी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघात झाल्यानंतर दोन्हीकडील थांबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातात क्रूझर चालक धनराज गंभीर कोळी हा वाहनामध्ये अडकून पडला होता. त्याला अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले. दरम्यान अपघात झाल्यानंतर सहा मृतदेह हे यावल ग्रामीण रुग्णालय, तर उर्वरित चार मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघातात मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (65), प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी (60), प्रभाबाई प्रभाकर चौधरी (40), आश्लेषा उमेश चौधरी (28), रिया जितेंद्र चौधरी (21), सोनाली जितेंद्र चौधरी (34), प्रियंका नितीन चौधरी (29, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर), सोनाली सचिन महाजन (34), सुमनबाई श्रीराम पाटील (55, रा निंबोल, ता. रावेर), संगीता मुकेश पाटील (40, रा. निंबोल ता. रावेर) असे हे दहा जण जागीच ठार झाले. प्रुझरमध्ये अडकलेला चालक धनराज तायडे याला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर शिवम प्रभाकर चौधरी (19, रा चिंचोल) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या 12 वर पोहोचली. या दुर्घटनेने चिंचोल, चांगदेव व निंबोल गावामध्ये शोककळा पसरली आहे. सर्वेश नितीन चौधरी (9), आदिती मुकेश पाटील (14, रा. निंबोल), सुनिता राजाराम पाटील (45, रा. चिंचोल), मीना प्रफुल चौधरी (30 रा. चिंचोल ता. मुक्ताईनगर), डंपर चालक मुकुंदा गणेश भंगाळे (रा. डाभुर्णी ता. यावल) हे जखमी आहेत.
डंपरचालक पोलिसांच्या ताब्यात
अपघातील जखमींना भुसावळ, सावदा, जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, डंपरचालक मुकुंदा गणेश भंगाळे याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच सकाळी ग्रामीण रुग्णालय यावल येथे आमदार शिरीष चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी तात्काळ भेटी दिल्या