ऑनलाईन टीम / जळगाव :
येवला तालुक्यातील बऱहाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर डंपर आणि क्रूझरच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.
सुमन श्रीराम पाटील (60), प्रभाकर नारायण चौधरी (63), प्रिया जितेंद्र चौधरी (10), प़्रभाबाई प्रभाकर चौधरी (45), सोनाली जितेंद्र चौधरी (35) सोनल सचिन महाजन (37), गंगाबाई ज्ञानेश्वर चौधरी (35) उमेश चौधरी (28) प्रियंका नितीन चौधरी (25), संगीता मुकेश पाटील (33), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
तर सुनिता राजाराम चौधरी, मीना प्रफुल्ल चौधरी, अंवी नितीन चौधरी, सर्वेश नितीन चौधरी, शंतनू मुकेश पाटील, आदिती मुकेश पाटील आणि शिवम प्रभाकर चौधरी हे अपघातात जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी एकाच कुटुंबातील असून ते चोपडा येथून स्वागत समारंभ आटोपून घरी परत येत होते. त्यावेळी डंपर आणि पूझरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.