प्रतिनिधी/ रत्नागिरी
बंगालच्या उपसागरात पुढील आठवडय़ात दुसरे उष्णकटिबंधीय वादळ तयार होऊ शकते, असे हवामानविषयक संकेतस्थळ स्कायमेटने वर्तवले आह़े ‘जवाद’ नावाचे हे चक्रीवादळ शाहीन चक्रीवादळाप्रमाणेच देशाच्या मध्यवर्ती भागातून अरबी समुद्रात घोंघावण्याची शक्यता आह़े यामुळे हवामानात बदल होऊन थंडीचा हंगाम लांबण्याची शक्यता आह़े यामुळे कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत. याचा परिणाम आंबा उत्पादनावर होऊन आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आह़े
जवाद हे चक्रीवादळ 13 ऑक्टोबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यापुढील 48 तासात ते आंध्रप्रदेशकडे सरकणार असल्याचे वर्तवले गेले आह़े पुढील 48 तासात अंदमानलगतच्या मार्तबानच्या खाडीजवळ चक्रीवादळ सरकणे अपेक्षित आहे. वादळाच्या प्रभावाखाली, कमी दाबाचे क्षेत्र 11 ऑक्टोबर रोजी आंध्रप्रदेशात निर्माण होणार आह़े
जवाद हे वादळ शेवटी लाओस आणि थायलंड ओलांडून म्यानमारला पोहोचेल. कमी दाबाच्या पट्टय़ाला पोषक असे वातावरण तयार होवून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान व कमी वाऱयामुळे अनुकूल पर्यावरणीय परिस्थितींतर्गत, बंगालच्या उपसागरात 2021 मान्सूननंतरचे पहिले चक्रीवादळ असणार आह़े या वादळामुळे समुद्रातील वादळी हंगामाची गती ही निर्धारित होणार आह़े बंगालच्या उपसागरात ऑक्टोबर महिन्यात या आधीही तीव्र वादळे आली आहेत़ 2013मध्ये व्ही चक्रीवादळाने संध्याकाळी गोपालपूरवर (ओडिशा) धडक दिली होत़ी 2007 मध्ये सिड्र चक्रीवादळानंतर उत्तर हिंद महासागरात असे करणारे हे पहिले वादळ होते. ’जवाद’ हे नाव सौदी अरेबियातून आले आहे आणि या पुढील वादळाला श्रीलंकेकडून ‘असानी’ असे नाव दिले जाईल.