ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काश्मीरमध्ये तैनात असलेल्या CRPF जवानांना असलेला घातपाताचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काश्मीरमधील जवानांना रजेवर जाताना MI-17 हेलिकॉप्टरचा वापर करता येणार आहे. CRPF नेही यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
रजेवर जाणाऱ्या जवानांना टार्गेट करून दहशतवाद्यांकडून आयईडी स्फोट घडवून आणला जाऊ शकतो. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रजेवर जाणाऱ्या जवानांना जवळच्या बेसवर हेलिकॉप्टरने सोडण्यात येणार आहे. जवानांना आठवड्यातील तीन दिवस ही सुविधा मिळणार आहे.