सांगली / पलूस
सांगली जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालय जवाहर नवोद्य विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 इयत्ता सहावीच्या 80 जागा साठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा तांत्रिक अडचणीमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य सुनीलकुमार नल्लाथ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता इयत्ता सहावीच्या 80 जगांसाठी प्रवेश परीक्षा 16 मे 2021 रोजी घेणार असल्याचे जाहीर केले होते.
परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात अली असून या नंतर परीक्षेची तारीख परीक्षेपूर्वी 15 दिवस जाहीर करण्यात येईल, परिक्षेबाबत माहिती विद्यालयाच्या वेबसाईटवर पहावी असे प्राचार्य सुनीलकुमार नल्लाथ यांनी स्पष्ट केले आहे. परिक्षेबाबत अधिक माहिती पुढील वेबसाईटवर मिळेल WWW.navodaya.gov.inhttps: तरी संबंधीत परीक्षार्थींच्या पालकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.