वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नागरिकांना स्थानिक पातळीवर सर्च इंजिनसारखी सुविधा देणारी कंपनी जस्ट डायलचा जानेवारी ते मार्च या तिमाहीमधील नफा 21.6 टक्क्मयांनी वाढून 76.1 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागील आर्थिक वर्षातील 2018-19 या तिमाहीत निव्वळ लाभ 62.5 कोटी रुपयांच्या घरात राहिला होता.
कोविड 19च्या महामारीच्या संकटामुळे सध्या देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या मार्च 23 पासून कंपनीची कार्यालये बंद आहेत, तेंव्हा कर्मचाऱयांना घरातून काम करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु आता केंद्राने आपल्या नियमावलीत काही प्रमाणात शिथिलता दिली असल्यामुळे कार्यालये सुरु करण्यात येत आहेत. यामध्येच कंपनीच्या संचालक मंडळाने 30 एप्रिल 2020 रोजी 220 कोटी रुपयांपर्यंत 31,42,857 समभागांची पुर्नखरेदी करण्याला मंजुरी दिली आहे.