प्रतिनिधी /वास्को
भारतीय तटरक्षक दलाच्या शोध व बचाव मोहिमेअंतर्गत समुद्रात बुडताना जहाजावरील एका अधिकाऱयाला वाचवण्यात आले. हा अधिकारी ग्रीक नागरीक आहे.
रविवारी सकाळी मुंबईतील मरिटाईम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटरला एम.व्ही. गॅलिनी जहाजावरून मदतीसाठी संदेश आला होता. या जहाजावरील ग्रीक नागरिक पापाडोपोऊलस डोनिसिस हा अधिकारी जहाजावरून अपघाती समुद्रात पडला होता. हे जहाज आगट्टी बेटाच्या पश्चिमेपासून सुमारे 625 सागरी मैलांवर होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन समुद्रातील संकटग्रस्त खलाशाला मदत करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलातर्फे शोध व बचाव मोहिम हाती घेण्यात आली. एम.व्ही. बारझन जहाजावरून शोध व बचाव कार्य हाती घेण्यात आले. सदर अधिकाऱयाला वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले. सदर अधिकारी सुखरूप आहे.