कोरोना महामारीमुळे देवस्थान समितीचा निर्णय
प्रतिनिधी / केपे
जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर देवस्थानात प्रती वार्षिक साजरा केला जाणारा प्रसिद्ध गुलालोत्सव यावषी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साजरा न करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. गुलालोत्सवाच्या काळात भरणारी फेरी तसेच महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमही यावषी लोकहिताचा विचार करून रद्द करण्यात आल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रकाश कुंदे यांनी कळविले आहे.
या उत्सवात गोवा तसेच गोव्याबाहेरील भक्तगण मोठय़ा उत्साहाने सहभागी होतात. देवस्थानच्या प्रांगणात भाविक मोठय़ा प्रमाणात गुलालोत्सवासाठी गर्दी करतात. या उत्सवात सामाजिक अंतर राखणे अशक्मय असल्याने त्यातून कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून काही ज्येष्ठ व्यक्तींनी केलेल्या सूचनांचा विचार करून आणि संबंधितांना विश्वासात घेऊन घेतलेल्या या निर्णयाला भक्तगणांनी सहकार्य करावे, असे समितीच्या वतीने कुंदे यांनी कळविले आहे.