दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान, बोलेरोचा चालक जखमी
वार्ताहर/ कणकुंबी
बेळगावहून गोव्याकडे जाणाऱया बोलेरो गाडीला गोव्याहून बेळगावकडे येणाऱया टाटा इनोव्हाने जोराची धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर बोलेरो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळली. यात चालक महेश याला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त समजताच जांबोटी ओsपीचे एएसआय बिडीमठ व हवालदार शिवकुमार बल्लारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून वाहतूक सुरळीत केली. गोव्याहून बेळगावकडे येणाऱया इनोव्हा (क्रमांक एपी-160-एम-1716) या गाडीने समोरून येणाऱया बेळगावहून गोव्याकडे जाणाऱया बोलेरो गाडीला (क्रमांक के.ए. 23-एö7141) जोराची धडक दिल्याने बोलेरो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला आदळली. या अपघातात इनोव्हाचा समोरील भाग चक्काचूर झालेला असून इनोव्हाचे चालक हे आंध्र प्रदेश येतील हायकोर्टचे वकील असल्याचे समजते. अपघाताची पाहणी करून पोलिसांनी दोन्ही गाडय़ा ताब्यात घेतल्या आहेत.