वार्ताहर/ जाकादेवी
जगाबरोबरच आपल्या देशाला व महाराष्ट्र राज्याला महाभयंकर केरोना संसर्गामुळे आर्थिक व सामाजिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या संसर्गातून राज्य लवकर बाहेर पडावे आणि राज्याला आर्थिक मदतीच्या उदात्त हेतूने जाकादेवी परिसरातील 20 चिरेखाण मालकांनी आपल्या चिरेखाण मालक संघटनेमार्फत 13 एप्रिल रोजी रत्नागेरीचे प्रांताधिकारी यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून 1 लाखाचा धनादेश सुपूर्द केला.
हा धनादेश संघटनेचे प्रतिनिधी खाणमालक प्रकाश जाधव, सुधीर देसाई, आनंद उर्फ मुन्ना मयेकर, रोहित मयेकर यांनी प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांच्याकडे प्रदान केला. आपत्कालीन स्थितीत ही संघटनेने अनेकदा शासनाला मदतीचा हात देत आली आहे. मानवता व बंधुत्वाच्या भावनेने या संघटनेने एक लाख रुपयाची मदत राज्यशासनाला †िरी आहे. ग्रामीण भागातून 1 लाख रुपयांच्या मदतीमुळे अनेक सामाजिक संस्थांनी या खाणमालकांचे कौतुक केले आहे.
आर्थिक मदतीचा हात देणाऱयांमध्ये संघटनेतील प्रकाश जाधव, सुधीर देसाई, आनंदा मयेकर, रोहित कोळवणकर, बाबाजी माने, उदय साळवी, अंकुश तांबे, अमित देसाई, दीपक पवार, प्रभाकर यादव, मुकेश मिरकर, संदेश मयेकर, गौरव पटेल, गजानन लांजेकर, परेश हळदणकर, उदय जाधव, संदेश महामाळ, चित्तरंजन मुळ्ये, स्वप्नील तोडणकर, जयवंत जाधव इ. खाणमालकांचा समावेश होता.