वारणानगर / प्रतिनिधी
जाखले ता.पन्हाळा येथील विवाहित महिलेची गावातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. सोनम निलेश गुरव वय.२३ असे तिचे नाव असून अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली असून या बाबतची फिर्याद तिचे सासरे हंबीरराव शंकर गुरव यांनी दिली. या बाबत कोडोली पोलीसांकडून समजलेली माहिती अशी, सोनम गुरव ह्या पहाटे घरात नसल्याचे घरच्यांच्या लक्षात आल्या नंतर शोधाशोध केली असता बामणाचे मळयातील विहिरी जवळ स्वेटर व चपला दिसल्या नंतर पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला.
तिला तातडीने कोडोली उपजिल्हा रुग्णायात आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सागर पोवार करीत आहेत. त्यांच्या मागे दोन मुले पती सासू व सासरे असा परिवार आहे.