मालवण / प्रतिनिधी:
दि.३० सप्टेंबर रोजी श्री. राजाराम गोविंद गावडे नांदोस- मालवण (६५ वर्षे) यांच्या करिता बाँम्बे ब्लड (Oh) ग्रुप या गटाचे सांगली तासगाव येथील रक्तदाते श्री.विक्रम यादव सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर व सचिव किशोर नाचणोलकर यांच्याशी संपर्क करुन आपण उद्या सकाळी ९ ते ९.३० पर्यंत जिल्ह्यात पोहचून जिल्हा रुग्णालय रक्तपेढीत आपले रक्तदान करु असे सांगितले.
श्री विक्रम यांच्या नावावर तब्बल ६५ वेळा बाँम्बे ब्लड दान केल्याचा विक्रम आहे.त्यांनी आता पर्यंत झारखंड, उत्तराखंड, बांगलादेश, विशाखापट्टणम, बेंगलोर,रांची, आग्रा, विजापूर, रत्नागिरी, म्हैसूर येथे तसेच दुबईसह ९ देशात रक्तदान केले आहे.
आज सिंधुदुर्गाशी या रक्ताने त्यांची नाळ जोडली जाणार आहे.