कृष्णा अभिमत विद्यापीठाचा नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलशी सामंजस्य करार
कराड प्रतिनिधी
येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलसोबत यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार केला. या करारानुसार कराडमध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या उपचारामध्ये सर्वोत्कृष्ट वैद्यकीय कौशल्य आणि अत्याधुनिक जागतिक दर्जाची तांत्रिक प्रगती आणणारा यशस्वी यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम तयार करण्यासाठी या दोन्ही संस्था सहकार्य करतील आणि काम करतील. तसेच या सामंजस्य करारामुळे कराडसह आसपासच्या भागातील रुग्णांना जागतिक दर्जाची यकृत प्रत्यारोपण उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे.
कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर म्हणाले, आमच्या संस्थेत यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्ससोबत जोडून घेताना आम्हाला आनंद होत आहे. या कार्यक्रमाद्वारे यकृताच्या जुनाट आजार आणि प्रत्यारोपणाच्या उपचारात बदल घडवून आणण्यासाठी आणि आमच्या वैद्यकीय सेवांना नवीन स्तरावर विकसित करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अपोलो हॉस्पिटल्ससोबतची भागीदारी आम्हाला कराडसह आसपासच्या लोकांना सेवा देण्यासाठी आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवेची जास्तीत जास्त सुलभता निर्माण करण्यास मदत करेल.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या अत्याधुनिक आरोग्य सेवा माफक दरात देण्याचा प्रारंभ केला आहे. तसेच कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स डीम्ड युनिव्हर्सिटी या संस्थेने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली आहे. कोविड-19 विरुद्धच्या लढाईतही कृष्णा विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलने अतुलनीय योगदान दिले असून, आजपर्यंत 8400 हून दोन संस्थांमधील सामंजस्य करारामुळे कराडमध्ये यकृत प्रत्यारोपण मोठय़ा प्रमाणावर होईल. त्यामुळे जीव वाचतील आणि उपचारांसाठी इतर शहरे आणि राज्यांमध्ये जाण्याची गरज दूर होईल.
अपोलो हॉस्पिटल्सचे युनिट हेड संतोष मराठे म्हणाले, कृष्णा अभिमत विद्यापीठासोबतच्या सहकार्यामुळे या भागातील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि यकृत उपचारांचा आयाम बदलेल आणि शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजारामुळे गुंतागुंत असलेल्या रुग्णांना त्याचा फायदा होईल. आमचे आणि कराडमधील तज्ञ यकृताचे आजार आणि प्रत्यारोपणामध्ये सर्वंकष काळजी प्रदान करतील. यकृत प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांना खर्च आणि सुलभतेच्या दृष्टीनेही याचा फायदा होईल आणि त्यांना उपचारासाठी इतर शहरे आणि राज्यांमध्ये जावे लागणार नाही. महाराष्ट्रातील इतर 4 प्रमुख केंद्रांवरही अपोलो हॉस्पिटल्समार्फत यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम चालविल जातो.
कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. अपर्णा पतंगे, डॉ. हेमंत जानुगडे, डॉ. मनीषा लद्दड, डॉ. मकरंद माने, डॉ. आनंद गुडूर, वैशाली यादव, अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. अमरीन सावंत, संजयकुमार सिंग, संदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.