पॅरिस
चालू वर्षात जागतिक पुस्तक दिनावर कोरोना संसर्गाचे सावट राहिलेले आहे. भारतामध्ये सामूहिक पातळीवर हा दिवस साजरा करण्याची स्थिती सध्या राहिलेली नाही. परंतु हा पुस्तक दिन साजरा करण्याचा उद्देsश, महत्व व त्याची असणारी परंपरा याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. जागतिक पुस्तक दिन हा दिवस जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जात आहे. युनेस्कोने सर्वात पहिल्यांदा 22 एप्रिल 1995 रोजी साजरा केला होता. सध्या तो प्रत्येक वर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. गंमतीशीर बाब म्हणजे ब्रिटन आणि आयरलँडमध्ये हा दिवस मार्च महिन्यातच साजरा केला जातो. यामुळेही या तारखेविषयी मोठा संभ्रम असल्याची माहिती आहे. या दिवसाचे मूळ विचार स्पॅनिश लेखक विसेंट क्लावेल ऍड्रेस यांनी मिगुल डि सेरवेंटेसच्या सन्मानामध्ये जन्मदिन 7 ऑक्टोबर तर त्यांची पुण्यतिथी 23 एप्रिल रोजी साजरी केली होती. 1995 मध्ये युनेस्कोने पुस्तक दिनाची तारीख अखेर 23 एप्रिलच अंतिम केली.