एल ऍण्ड टी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सचा प्रवास तेजीसोबत झाला आहे. यामध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 142 अंकांनी वधारला आहे. ही कामगिरी होण्यासाठी सोमवारी प्रमुख कंपन्यामध्ये लार्सन ऍण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड आदीच्या कामगिरीने हे यश प्राप्त करण्यात सेन्सेक्स यशस्वी झाला आहे.
दिवसभरात एका क्षणी सेन्सेक्स 390.12 अंकांनी वधारला होता, परंतु नफा कमाईच्या कारणामुळे ही तेजी काहीशी ओसरत दिवसअखेर सेन्सेक्स 141.51 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,182.08 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 56.10 अंकांनी वधारुन 11,270.15 अंकावर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये सोमवारी लार्सन ऍण्ड टुब्रोचे समभाग सर्वाधिक चार टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, सन फार्मा, एनटीपीसी, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसीचे समभाग नफ्यात राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यांच्या दुसऱया बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्ट्स, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्सचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारातील मजबूत संकेतामुळे देशातील बाजारात उत्साहाचे वातारण राहिले होते. विदेशी अर्थसाहाय्य गुंतवणूक प्रवाह कायम राहिला असल्याचा सकारात्मक परिणाम हा लाभदायक ठरला आहे. शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार मागील आठवडय़ातील शुक्रवारी विदेशी संस्थाकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीने बाजारात 397.32 कोटी रुपयाचा निक्वळ लिलाव झाला आहे. अन्य बाजारात आशियाईमधील शांघाय आणि सोलचे शेअर बाजार तेजीसोबत बंद झाले आहेत. तर हाँगकाँग शेअरबाजारात घसरण झाली आहे. युरोपचा शेअर बाजार प्रारंभी तेजीत होता. एकंदर, सध्या शेअरबाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.