वेंगुर्ले / वार्ताहर-
ओम योगसाधनालय संचलीत डाॅ. वसुधाज योगा अॅड फिटनेस अँकॅडमीच्या माध्यमातून देश- विदेशात योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या योगगुरु डाॅ. वसुधा मोरे यांचा सत्कार माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर व प्रदेश सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
डाॅ. वसुधा मोरे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेमध्ये यश संपादन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले . तसेच विविध मानाचे पुरस्कार मिळवलेले आहेत. तसेच योगाच्या संबंधित राष्ट्रीय योग शिक्षा कार्यकारीणीवर सन्माननीय सदस्य म्हणून कार्ययत आहेत. तसेच वैद्यकशास्त्राच्या माध्यमातून रुग्णसेवाही केलेली आहे . तसेच योगशास्त्र व क्रीडायोगाच्या माध्यमातून योगपटु व योगप्रशिक्षक निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. या कार्याची दखल घेऊन भाजपा सिंधुदुर्गच्यावतीने योगगुरु डाॅ. वसुधा मोरे यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर , नगरसेवक प्रशांत आपटे व धर्मराज कांबळी , नगरसेविका पुनम जाधव, महिला सरचिटणीस वृंदा गवंडळकर ,तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .