शाओमी, सॅमसंगचाही समावेश : ऍपलची लोकप्रियता कायम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आपण यावर्षी नवा स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर मागच्या वर्षी कोणता स्मार्टफोन विक्रीत अग्रेसर राहिला हे पाहणे आवश्यक ठरणारे असेल. मागच्या वर्षी जागतिक स्तरावर पाहता ऍपल आयफोन 12 हा सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे. या फोनने विक्रीत बाजी मारली आहे.
आयफोन 12, आयफोन 12 प्रो मॅक्स आणि आयफोन 13 या फोन्सना मागणी अधिक राहिली आहे. ऍपलने आयफोन 13 2021 मध्ये लाँच केला होता, ज्याला चौथ्या तिमाहीत ग्राहकांना आकर्षित करण्यात यश प्राप्त झालं आहे. यानंतर शाओमी आणि सॅमसंग यांनीही 2021 मध्ये स्मार्टफोन विक्रीत नंतरचे स्थान काबीज केले होते. आघाडीवरच्या यादीतील 3 टॉप फोन्समध्ये ऍपलची एकूण विक्री 41 टक्के इतकी होती. ऍपलव्यतिरीक्त सॅमसंग ए 12 स्मार्टफोनने जागतिक स्मार्टफोन विक्रीत सहावे स्थान पटकावले आहे. शाओमी रेड मी 9 ए व रेडमी 9 हे 2021 च्या यादीत समाविष्ट असून यांची एकूण विक्री 22 टक्के इतकी राहिली होती.
पाहुया जागतिक स्तरावरचे टॉप 10 स्मार्टफोन्स कोणते ते
फोन बाजारातील वाटा सुरूवातीची किंमत
आयफोन 12 2.9 टक्के 65 हजार 900 रु
आयफोन 12 मॅक्स 2.2 टक्के 1 लाख 19 हजार रु
आयफोन 13 2.1 टक्के 69 हजार 900 रु
आयफोन 12 प्रो 2.1 टक्के 1 लाख 4 हजार 900 रु
आयफोन 11 2.0 टक्के 49 हजार 900 रु
सॅमसंग गॅलक्सी ए 12 2.0 टक्के 12 हजार 999 रु
शाओमी रेडमी 9 ए 1.9 टक्के 6 हजार 999 रु
आयफोन एसइ 2020 1.6 टक्के 43 हजार 900 रु
आयफोन 13 प्रो मॅक्स 1.3 टक्के 1 लाख 29 हजार 900 रु
शाओमी रेडमी 9 1.1 टक्के 10 हजार 988 रु