बेळगाव लीकर मर्चंट्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : बंदकाळात शुल्क भरणे अवघड
प्रतिनिधी / बेळगाव
आता मद्यविक्री ऑनलाईनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होत आहे. पूर्वी 20 टक्के कमिशन दिले जात होते. मात्र, आता विक्रीसाठी केवळ 10 टक्के कमिशन देण्यात येत आहे. याचबरोबर एमएसआयएल दुकानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे व्यवसाय करणे कठीण जात असून विविध जाचक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो असून तातडीने जाचक नियम रद्द करावेत, याचबरोबर कमिशनमध्ये वाढ करावी, या मागणीसाठी द बेळगाव लिकर मर्चंट्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळे नियम लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे मद्य विपेते अडचणीत येत आहेत. काही कायदे आहेत ते जाचक आहेत. सीएल-7 ही दुकाने अडचणीत येत आहेत. जिह्यामध्ये जवळपास एमएसआयएलची दुकाने 2 हजारांपेक्षा अधिक झाली. त्यामुळे दारू दुकानदार अडचणीत आले आहेत. यातच आता काही ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून विक्री सुरू करण्यात आली आहे. इतर ठिकाणीही विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आले असून सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
कोरोना काळात आम्ही अडचणीत आलो आहे. कोरोनामुळे दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र, शुल्क आकारणी केली आहे. व्यवसाय नसताना शुल्क भरणे अवघड जात आहे. तेव्हा ते शुल्क परत करावे किंवा सुट करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. एकूणच जे जाचक नियम व अटी घालण्यात आल्या आहेत त्या रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष रमेश सालगार, उपाध्यक्ष आनंद चव्हाण, सेपेटरी एम. बी. जाधव, खजिनदार पी. वाय. सोलाखे, शंकर हेगडे, राजू बोरगावी, रवी सनसुद्दी, नानासाहेब सौंदलगे, संदेश शेट्टी, विनायक मुडशी, वसंत खोत, शेखर हेगडे, खानापूर असोसिएशनचे चेअरमन सुजीत कलाल यांच्यासह मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.