बुधवार. दि. 30 ते मार्च मंगळवार 5 एप्रिल 2022 पर्यंत
नमस्कार. मागच्या आठवडय़ामध्ये आपण राहू, केतू आणि शनी यांच्या राशी परीवर्तना बद्दल चर्चा केली .यामध्ये शनीच्या राशी परिवर्तनाबद्दल मी वेगळा एक लेख लिहीन. सध्या राहू आणि केतू बद्दल एका पौराणिक मान्यतेनुसार प्रल्हादाच्या बहिणीचे नाव सिंहिका. हिला स्वरभानू नावाचा मुलगा होता ज्याने अमृत मंथनाच्या वेळी रूप् बदलून ( अर्थातच देवांनीही राक्षसांनी विरुद्ध कट कारस्थानच केलं हा भाग वेगळा!!!) अमृतपान केले त्यावेळेला चंद्र आणि सुर्य यांनी याची चहाडी महा विष्णूंकडे केली आणि महा विष्णूंनी सुदर्शन चक्र फेकून स्वरभानूचे डोके आणि धड वेगळे केले डोक्मयाच्या भागाला राहू आणि धडाच्या भागाला केतू असे नाव पडले. सूर्य चंद्र यांनी चहाडी केली म्हणून राहू आणि केतू सूर्य चंद्राला ग्रहण लावतात म्हणजेच त्यांना गिळतात. हा झाला पौराणिक कथेचा भाग. ज्योतिष शास्त्रीय दृष्टय़ा नवग्रहा पैकी सात ग्रहांना अस्तित्व आहे. राहू आणि केतू हे शास्त्रीय दृष्टय़ा मुळात ग्रहच नाहीत. ते छेदन बिंदू आहेत. पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा जिथं एकमेकाला छेदतात त्या आकाशीय बिंदूंना राहू आणि केतू असे नाव दिले गेले .उत्तर छेदन बिंदू ला राहू आणि दक्षिण छेदन बिंदू ला केतू असे म्हणतात. मुळात जर त्यांना भौतिक अस्तित्व नाही तर मग ते त्यांचा परिणाम कसा दाखवतात? तर कृष्णमूर्तींनी म्हटल्याप्रमाणे ऱदो् arा strदही tप्aह ज्त्aहे .सातही ग्रहांना गिळण्याचे सामर्थ्य या दोन ग्रहांकडे आहे. हे ग्रह ज्या राशीत बसतात, ज्या ग्रहां बरोबर बसतात, ज्या ग्रहांची त्यांच्यावर दृष्टी असते त्या ग्रहांचा सगळं सामर्थ्य हे पात बिंदू खेचून घेतात. म्हणूनच ज्योतिष शास्त्रात या दोन ग्रहांना अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहे. आता राहू आणि केतू यांचे स्वरूप कसे आहे हे समजून घेऊ. राहू भोगाचा तर केतू मोक्षाचा कारक आहे. राहु भोगी असेल तर केतू त्यागी. एक रसीक तर दुसरा विरक्तीचा उपासक. एक राजा तर दुसरा रंक. राहू म्हणजे माया , भ्रम्, शरीरातली विषारी द्रव्य राहू ,विषारी वायू, आमवात ,मनोविकार. राहू हा तमोगुणी आहे, करारी आणि धाडसी आहे, स्वातंत्र्यप्रिय सूड बुद्धीचा आहे. सुखाची लालसा करणारा आहे, निर्दयी आहे, विश्वासघातकी आहे, स्वभावाने थोडा कठोर, हौशी आहे ,रसिक आहे, कला कौशल्याचा भोक्ता आहे. दिला तर राजा करून दिल आणि घेतला तर सगळं समाप्त करेल. केतू हा सत्त्वगुणी, धार्मिक आहे. साधी राहणी, निरपेक्ष वृत्ती, कष्टाळू, अल्पसंतुष्ट, बुवाबाजी, अति धार्मिक अंधश्रद्धाळू आहे. हा गबाळा आहे. मोकळय़ा मनाचा आहे. बडबडा आहे. निरशावादी आहे. राहु विषबाधा देतो विषारी किंवा हिंस्त्र प्राण्यांच्या दंशामुळे होणारे विकार देतो. त्वचाविकार, खरूज, नायटा, गजकर्ण, कॅन्सर प्रदूषणामुळे होणारे रोग, कावीळ, व्यसनाधीनता, नशा हे सगळं राहूच्या अमलाखाली येत्. केतू उष्णतेचे रोग देतो. विषबाधा, युरिन इन्फेक्शन, गुडघेदुखी, गॅसेस साथीचे विकार हे सगळं केतू अमलाखाली आहे. यावेळी जे राशी भविष्य दिले आहे ते राहू केतू च्या राशी परिवर्तना वर आधारीत आहे. साप्ताहिक राशीभविष्य नाही हे नमूद करावे.
महा उपाय ः नशीब उघडण्या करता शुक्रवारी एक नवीन चांगले कुलूप आणावे. रात्रभर उशा जवळ ठेऊन सकाळी बंद अवस्थेत चावी घालुन (पण न उघडता) मंदीरात ठेऊन यावे. ज्या वेळी कोणी हे कुलूप उघडेल, तुमचे नशीब ही उघडेल!
सोपी वास्तू टिपः ईशान्य दिशेला पळत्या घोडय़ांचा फोटो लावावा
मेष
कार्यक्षमतेमध्ये वाढ आरोग्याची समस्या होईल. नेत्र पिडा किंवा मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. गाफील राहिल्याने नुकसान होईल. अनाठायी खर्च संभवतो. कामानिमित्ताने प्रवास होईल. वरि÷ांची गैरमर्जी होऊ शकते. वैवाहिक जीवनात ताण तणाव येईल. उपाय जमेल तितकी गणपतीची उपासना करावी.
वृषभ
अनाठाई खर्च होईल. कर्जे वाढतील. नोकरीमध्ये समस्या येऊ शकतात. कोर्ट कचेरी मध्ये यश मिळणे अवघड जाईल. दूरचे प्रवास होतील. अध्यात्मकि शक्ती वाढेल. परदेशगमनाची संधी. दुसऱयाला कमी लेखण्या मुळे त्रास होऊ शकतो .व्यवसायात योजना यशस्वी होतील. उपाय शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करावे.
मिथुन
सौख्य आणि समाधान लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. मित्राकडून फसवणूक होईल. रोगा पासून सावध राहावे. शिक्षण संतती या दृष्टीने काळ योग्य नाही. राबणे फुकट गेल्याने मनस्ताप होऊ शकतो. शेअर मार्केट किंवा तत्सम धोकादायक गुंतवणुकीपासून दूर रहावे. ज्ये÷ भाऊ किंवा बहिणीला त्रास होऊ शकतो. उपाय दुर्गा कवच पठाण करावे
कर्क
प्रमोशन आणि अधिकाराचा लाभ होईल. सत्ता मिळेल. राजकारणात यश मिळेल. थोरा-मोठय़ांच्या ओळखी होतील. आणि त्यातून फायदा होईल. उद्योगधंद्यामध्ये उलथापालथ होईल. तुमच्या कामाचा दर्जा घसरणार नाही याची काळजी घ्यावी. मुत्सद्दीपणा उपयोगाला येईल. भांडणे होतील. स्थावर इस्टेट संबंधी समस्या होतील. उपाय कालभैरवाची उपासना करावी.
†िंसंह
धार्मिक कार्य करू नये असे वाटेल. कामात अडथळे येतील. शेती व्यवसायात लाभ होईल. मानसन्मान यात वाढ होईल. पाखंडी व्हाल. दूरच्या प्रवासात खंड पडेल. भावंडांमध्ये भांडणे होतील. फोनवर बोलताना किंवा लेखी कामात सावध राहावे लागेल. वडिलांच्या तब्येतीला जपावे लागेल. उपाय नवग्रहा स्तोत्रा ची नऊ पारायणे रोज करावी.
कन्या
अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. अनाकलनीय शारीरिक त्रास संभवतो. कुठल्याही प्रकारे लाच देणे किंवा घेणे यापासून दूर रहा. वैवाहिक जोडीदाराच्या माहेरच्या लोकांना त्रास संभवतो. आर्थिक अडचण येऊ शकते. परिवारात भांडणे होतील. अर्थप्राप्ती मध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. कष्टाचे प्रमाण वाढवावे. उपाय सप्तशतीचे पाठ करवून घ्यावेत.
तूळ
कामे झटपट उरकून घेण्याकडे कल असेल. पूर्वग्रह दूषित राहाल. विषय वासने मध्ये वाढ होईल. अनैतिक संबंधां पासून दूर रहा. वैवाहिक जोडीदाराशी कलह होतील. कामाच्या ठिकाणी सहयोग कमी होईल. मन निराशावादी होऊ शकते. तब्येत सांभाळावी लागेल .उपाय नित्य देवी उपासना करावी
वृश्चिक
सुख समृद्धी येईल. धनलाभ होईल. ऐश्वर्य प्राप्त होईल. उद्योग-धंद्यात बरकत येईल. मान सन्मान वाढेल. चोरीपासून नुकसान होऊ शकते. तुमच्या चांगल्या कामाची कीर्ती दूरवर पसरेल. या कालावधीतील भाग्यवान रास तुमची आहे. प्रकृतीची काळजी मात्र घ्यावी लागेल. उपाय गणेश आराधना करा
धनु
संतती ची काळजी राहील. शिक्षणामध्ये अडथळे येऊ शकतात. करिअरमध्ये बदल होऊ शकतो. गर्भधारणेस अडथळा येऊ शकतो. प्रसिद्धीत वाढ होईल .धन प्राप्ती चांगली असेल. गुढ विद्या शिकण्याकडे कल असेल .शत्रू परास्त होतील. उपाय सुयोग्य गुरुजींकडून सप्तशतीचे पाठ करून घ्यावेत
मकर
कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद होऊ शकतात. आई-वडिलांच्या दृष्टीने येणारे 18 महीने त्रासदायक ठरू शकतील. स्थावर मालमत्ता विमा जमिनीच्या व्यवहारामध्ये फसगत होऊ शकते. वाहन संबंधी समस्या येऊ शकतात. आर्थिक चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. घर गृहस्ती मध्ये तणाव येऊ शकतो. उपाय शिव चालीसा चा नियमित पाठ करावा
कुंभ
ऐश्वर्या मध्ये वाढ होईल. सुख लाभेल. आर्थिक लाभ होतील. प्रवासात नुकसान संभवते. भाऊबंदकी मुळे नुकसान होऊ शकते. ढोंगीपणा येईल. संताप वाढेल. पापाचरण आकडे वृत्ती असेल .आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी. भंपकपणा करू नये .आळ येईल असे कोणतेही काम करू नये. उपाय नियमित देवीचे दर्शन घ्यावे सेवा करावी
मीन
बोलण्यामध्ये कठोरता येईल. भांडणे होतील. कुटुंबात समस्या असतील. अशांतता अनुभवाल. अनावश्यक खर्च वाढेल. धनप्राप्ती करता अधीक कष्ट करावे लागतील. जवळच्या व्यक्तीची जबाबदारी अंगावर पडेल. राग वाढेल. शारीरिक व्याधी होतील. गुदद्वारा चे विकार होऊ शकतात. उपाय नियमित हनुमान चालीसा चा पाठ करावा