ऑनलाईन टीम/तरुण भारत
दक्षिण आफ्रिकेत प्रथम नोंदवलेला करोनाचा नवीन प्रकार, ओमिक्रॉनमुळे जानेवारीमध्ये देशात कोरोनाची देशात सौम्य तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि संक्रमण कमी होण्यापूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ती संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती IIT-हैदराबाद आणि IIT कानपूरच्या संशोधकांनी शनिवारी विकसित केलेल्या महामारीच्या सुप्रसिद्ध सूत्र गणितीय मॉडेलच्या अभ्यासानंतर समोर आली आहे. SUTRA प्रोजेक्शन मॉडेलने सूचित केले आहे की ओमिक्रॉनमुळे येणारी तिसरी लाट जानेवारी ते मार्च दरम्यान दररोज सुमारे २ लाख कोविड पॉझिटिव्ह होऊ शकतात ते म्हंटले आहे.