प्रतिनिधी /बेळगाव
बिग बाजारने 19 ते 26 जानेवारीदरम्यान ग्राहकांसाठी खास सवलतीच्या दरात विविध वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फॅशन अपेरल्स, पादत्राणे, खेळणी व अन्य अनेक वस्तूंवर ग्राहकांना सवलत मिळणार आहे. बिग बाजार ऍपच्या माध्यमातून घरपोच सेवाही देण्यात येणार आहे.
ग्राहकांनी 2500 रुपयांची खरेदी केल्यास त्यांना व्हाऊचर्स मिळणार असून एसबीआय क्रेडिट कार्ड असल्यास 3500 च्या खरेदीवर 7.5 टक्के सवलत मिळणार आहे. बिग बाजारमध्ये तूरडाळ 89 रुपये, हरभरा डाळ 59 रुपये, देशी तूप 364 रुपये लिटर, टाटा टीच्या दोन पॅक खरेदीवर एक मोफत, सहा किलोच्या टाईडवर 180 रुपयांची सवलत, बेडशीट आणि ब्लँकेटसाठी 50 टक्के सवलत, याशिवाय महिला-पुरुष, मुले यांच्या फॅशन आणि पादत्राणांच्या खरेदीवर एकावर एक मोफत अशी सवलत देण्यात येत आहे.
याबद्दल बोलताना बिग बाजारचे सीएमओ म्हणाले, दरवर्षीपेक्षा यावर्षी ‘सब से सस्ते दिन’ सुविधा ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. दोन तासांमध्ये घरपोच सामान पोहाचविणे हे बिग बाजारचे उद्दीष्ट आहे. बिग बजारमधून ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सब से सस्ते दिन, पब्लिक हॉलिडे सेल, वेन्सडे बाजार, ग्रेट इंडियन होम फेस्टिव्हल, अशा अनेक खरेदीच्या योजना बिग बाजार ग्राहकांना देत आहे, असेही ते म्हणाले.