ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला असून, या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे.
नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान एका माथेफिरू तरुणाने गोळीबार केला. अज्ञात माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी अजून त्याची ओळख पटलेली नाही.
दरम्यान, या गोळीबारात जखमी झालेल्या आंदोलक विद्यार्थ्याच्या हाताला गोळी लागल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी होली फॅमिली परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.