प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारचे अध्यक्ष म्हणून श्रीधन मलीक, उपाध्यक्ष म्हणून विजय खोत व सचिन केळवेकर, खजिनदार म्हणून किरण वेसणे व सचिव गणेश गुंडप यांची निवड झाली आहे. त्यांचा व अन्य पदाधिकाऱयांचा पदग्रहण कार्यक्रम दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता सचिन साखरे मेस हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स फेडरेशनचे अध्यक्ष अनंत जांगळे, फेडरेशनचे माजी अध्यक्ष राजू माळवदे, माजी युनिट डायरेक्टर एम. गंगाधर, प्रवीण त्रिवेदी आणि जायंट्स परिवारचे माजी अध्यक्ष दीपक हावळ उपस्थित राहणार आहेत.
या सोहळय़ाला जायंट्स परिवारच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव या संस्थेने केले आहे.