प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतनच्या मैदानात विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित राहिले होते. मैदानाला जत्रेचे स्वरुप आले होते. त्यामुळे अनेक खाद्यपदार्थ विपेत्यांनी येथे स्टॉल्स मांडले होते. भाविकांनी खाद्यपदार्थ खाऊन रद्दी पेपर, प्लेट्स, चमचे, ग्लास व इतर साहित्य मैदानावरच फेकले. गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी पडत असलेल्या कचऱयाची उचल दुसऱया दिवशी सकाळी जायंट्स मेनच्या माध्यमातून केली जाते. यावषीही ग्रूपच्या सदस्यांनी विद्यानिकेतन मैदानावर स्वच्छता मोहीम राबवली, असे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांनी सांगितले.
स्वच्छता आणि प्लास्टिक वापराच्या बाबतीत अजूनही म्हणावी तशी जागरुकता लोकांत झालेली नसल्याने फेडरेशन संचालक मदन बामणे यांनी नाराजी व्यक्त केली. स्पे. कमिटी सदस्य मोहन कारेकर यांनीही जनतेला पुन्हा एकदा स्वच्छता राखण्याबद्दल आवाहन केले आणि राष्ट्र सेवा दलाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
पहाटेपासून जायंट्सचे माजी अध्यक्ष संजय पाटील, सुनील भोसले, अशोक हलगेकर, सेपेटरी मुकुंद महागावकर, उपाध्यक्ष सुनील मुतगेकर, अविनाश पाटील, सुनील चौगुले, दिगंबर किल्लेकर, विजय बनसुर, अजित कोकणे, महेश शहापूरकर, आनंद कुलकर्णी, महादेव भस्मे, प्रकाश तांजी, विनोद आंबेवाडीकर, पद्मप्रसाद हुली, नारायण किटवाडकर यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.
राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरार्थींचे विशेष सहकार्य
दरवषी केल्या जाणाऱया या सीमोल्लंघन मैदान स्वच्छता मोहिमेत यावषी राष्ट्र सेवा दलाचे विशेष सहकार्य लाभले. मराठी विज्ञानिकेतन शाळेत गेला आठवडाभर राष्ट्र सेवा दलाचे शिबिर सुरू असून शिबिरार्थींनी या मोहिमेत भाग घेऊन जायंट्सच्या स्वच्छता चळवळीला सहकार्य केले. उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल सेवा दल प्रमुख बाबासाहेब मगदूम यांनी जायंट्सला धन्यवाद दिले.