प्रतिनिधी/ बेळगाव :
गेल्या तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आणि अल्पावधीतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया महिला आणि मुलींसाठी काम करणाऱया जायंट्स सखी या सेवाभावी संघटनेच्या अध्यक्षपदी नीता पाटील यांची तर सचिवपदी शीतल पाटील यांची निवड झाली आहे. शुक्रवार दि. 26 रोजी अधिकारग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. संघटनेच्या उपाध्यक्षपदी चंद्रा चोपडे आणि विद्या सरनोबत तर खजिनदारपदी लता कंग्राळकर यांची निवड झाली आहे. संचालक म्हणून सुलक्षणा शिनोळकर, ज्योती पवार, शीतल नेसरीकर, अनुपमा कोकणे, अर्चना पाटील आणि सुलोचना कुटे यांची निवड झाली आहे.
अध्यक्षा नीता पाटील या फुलबाग गल्लीतील राजमाता महिला मंडळाच्या खजिनदार असून सुरुवातीपासून त्या सखीच्या सदस्या आहेत. उपाध्यक्षा चंद्रा चोपडे या राजमाता महिला मंडळाच्या अध्यक्षा असून गेली अनेक वर्षे त्या सामाजिक कार्य करत आहेत. उपाध्यक्षा विद्या सरनोबत यांनी कंग्राळ गल्लीतील एकता महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे.
सचिव शीतल पाटील या पदवीधर असून त्या नर्सरी स्कूल चालवितात. खजिनदार लता कंग्राळकर यासुद्धा पदवीधर असून त्याही सखीच्या सुरुवातीपासूनच्या सदस्या आहेत.
अधिकारग्रहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स वेल्फेअरचे मोहन कारेकर तर अध्यक्ष अनंत जांगळे उपस्थित राहणार आहेत. विभागीय संचालक मदन बामणे यांच्या हस्ते अधिकार प्रदान करण्यात येणार असून प्रमुख वक्त्या म्हणून दया शहापूरकर उपस्थित राहणार आहेत.