प्रतिनिधी/ बेळगाव
एक डिसेंबर हा दिवस जगभर जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर एड्स दिनाच्या पूर्वसंध्येला जायंट्स सखीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी रेलनगर येथील नंदन मक्कळ धाम या एचआयव्ही बाधित मुलांच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली. तेथील मुलांची चौकशी करून त्यांना लागणाऱया मल्टिव्हिटॅमिन, सर्दी-खोकल्यावर उपयोगी पडणारी औषधे, कपडे व इतर साहित्य संस्थेच्या प्रमुख कस्तुरी बंगेरी यांच्याकडे सुपूर्द केले.
आपल्या डॉक्टरी पेशाबरोबर नेहमीच सामाजिक कार्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱया डॉ. सुरेखा पोटे यांच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली. यावेळी सखीच्या अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर, सचिव शीतल पाटील, उपाध्यक्षा चंद्रा चोपडे, विद्या सरनोबत, नम्रता महागावकर, खजिनदार लता कंग्राळकर, सुलक्षणा शिन्नोळकर, ज्योती पवार, अर्चना पाटील, शीतल नेसरीकर, दीपा पाटील उपस्थित होत्या.