बेंगळूर/प्रतिनिधी
माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्या लैंगिक सीडी घोटाळ्याचा राज्यात सुरू असलेल्या पोटनिवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कर्नाटकचे समाज कल्याण मंत्री बी. श्रीरामुलू यांनी सोमवारी सांगितले.
मस्की येथील पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार प्रताप गौडा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रीरामुलू यांनी, मतदारसंघाच्या विकासाच्या आधारे पक्षाला मते मिळतील, असे ते म्हणाले, त्यामुळे आमचे उमेदवार जिंकतील.”
विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी भाजपचे खासदार गुलाम असल्याचे म्हटले होते अशा वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री म्हणाले की पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीमुळे कॉंग्रेसचे नेते असे बोलत आहेत. दरम्यान सिद्धरामय्या ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी अशी विधाने करू नयेत असते म्हणाले.