2157, डिस्चार्ज 1892, बळी 62,ऍक्टिव्ह 203
प्रतिनिधी / मेढा
जावली तालुक्यात मंगळवारी रात्री 19 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये घरातघर 4, गांजे 6, कुसुंबी 1, भिवडी 1, सर्जापूर 2, खर्शी तर्फ कुडाळ 2, काटवली 1, वाळंजवाडी 1, दुंद 1 यांचा समावेश आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
दरम्यान, गेले आठ दिवस बाधितांचा आकडा आटोक्यात होता परंतू आज पुन्हा बाधितांची आकडेवारी वाढली आहे. कोरोनाचा आता सामाजिक संसर्गाचा टप्पा असल्याने लोकांनी पावलोपावली काळजी घेऊन सुरक्षित राहणे आवश्यक आहे. विषेशतः गर्दीत जाणे टाळले पाहिजे. तसेच मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे.