प्रतिनिधी/ मेढा
जावली तालुक्यात पुनवडी येथील आणखी आठ जणांचा अहवाल शनिवारी रात्री कोरोना पाँसिटीव्ह आला आहे. यापूर्वी पुनवडी येथे नऊ रुग्ण आढळले असून एकूण 17 कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण झाले आहेत . हे गाव आता कोरोनाचा हाँटस्पाँट बनले आहे.
जावली तालुक्यात शनिवार अखेर एकूण कोरोना पाँसिटीव्ह 166,बळी11,मुक्त 94,अँक्टिव्ह 59 तर धोंडेवाडी येथील दोघांचे अहवाल पुन्हा पाँसिटीव्ह आले आहेत. अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
जावलीतील सरताळे गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ा मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील सरताळे येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने या गावाला जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार सरताळे या गावाला प्रतिबंधित क्षेत्राचे (कन्टेमेंट झोन )निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
रविवार पासून आठ दिवसांसाठी कुडाळ बाजारपेठ बंद
जावली तालुक्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या व कुडाळच्या सीमेलगत तीन किलोमीटरवर असणाया सरताळे येथे शुक्रवारी कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दि.12/7/20 ते 19/7/20 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कुडाळ बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थ व व्यापारी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मेढा सुद्धा काही दिवस बंद ठेवण्याची गरज आहे…. ! .
वास्तविक पाहाता निझरे येथील पहिला रुग्ण सापडल्यावर परिसरातील 3 कि मी. अंतरावरील सर्वच गांवे सिल कर0यात आली होती . तर मेढा बाजार .पेठही बंद होती . तालुका कोरोना मुक्त करायचा असेल तर मेढा हे जावली तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण काहीं . दिवसांसाठी बंद ठेवण्याची मागणी होत आहे कारण मेढाच्या परिसरात कोरोना रुग्ण यापूर्वी सापडले असुन ते बरे झाले असले तरी पुनवडी गावा हे 10 कि मी . च्या अंतरावर आहे. आणि सध्या पुनवडी हे गांव कोरोनाचे हॉट स्पॉट बनत आहे.
दरम्यान पोलीस , प्रशासन व नगरपंचायत यांनी मेढा बाजारपेठेत कडक धोरण अवलंब0यास सुरुवात केली असून विनाकारण टु व्हीलरवर फिरणारे , विना मास्क फिरणारे सापडल्यास पोलीसांचे बरोबरच नगरपंचायतीचे अधिकारीही कडक कारवाई करत आहेत .सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोळ व त्यांचे सर्व सहकारी तसेच मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार व त्यांचे सहकारी मेढा येथील गर्दी वर बारीक लक्ष ठेवून आहेत. जो नियमांचे उल्लंघन करणारा सापडेल त्याला सुट्टी नाहीच.आरोग्य विभाग , आशा , अंगणवाडी सेविका जीवाच रान करुन काम करत आहेत. तरीही मुंबईवरून येणारांचे मुळे जावलीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.