कुडाळ / प्रतिनिधी :
जावली तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपीसह मिटवा मिटवी करणाऱ्या सरपंच तंटामुक्ती अध्यक्षांसह सहा जणांना आज मेढा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मेढा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी दिली आहे.
चार दिवसापूर्वीच जावली तालुक्यातील एका गावात अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका 65 वर्षीय नराधमाला मेढा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सदर प्रकरण गावातच पीडित कुटुंबीयांना 25 हजार रुपयांचे आमिष दाखवत मिटवा मिटवी करण्यासाठी गावचा सरपंच व तंटामुक्तीचा अध्यक्ष व इतर पाच जण गावची बैठक जमवत पीडित कुटुंबीयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला व दबाव आणणारे गाव टगे गणेश ज्ञानेश्वर पवार,, प्रमोद कृष्णा कांबळे किशोर तुकाराम महामुलकर ,अशोक ऊर्फ आनंदा निवृत्ती महामुलकर, दिलीप दिनकर महामुलकर सर्व राहणार नेवरेकर वाडी असे एकूण मुख्य आरोपी सहा जण या प्रकरणांमध्ये आरोपी करण्यात आले आहेत. त्यांना आज मेढा न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने या सहा जणांना 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणात आणखी कोण सामील आहे, याबाबत पोलीस तपास करणार आहेत.