रॉयल्टी न भरता बेसुमार उत्खनन सुरु
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाबळेश्वर-रहिमतपूर सुरु असलेल्या रस्त्याच्या बांधकामामध्ये जावली तहसील कार्यालयाला उत्खननाची रायल्टी न भरता राजरोसपणे रस्ता व केळघर घाटाचे काम सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जावली तहसिलदार कार्यालयाने रायल्टीबाबत मागणी करुन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने जावली तहसिलदारांच्या पत्राला केराची टोपली दाखवली. शेतकऱयांच्या मुंडक्यावर बसून रायल्टीचा तगादा लावणाऱया तहसिलदार कार्यालयाला मात्र, ठेकेदार रोडवे सोल्युशन इंडीया कंपनीला रायल्टी न भरता बेसुमार उत्खनन करुन चुना लावला आहे.
महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे काम गेली दोन वर्षाहून अधिक काळापासून जावली तहसिल कार्यालयाच्या हद्दीमध्ये सुरु आहे. रस्त्याच्यी दुतर्फा ठेकेदार कंपनीकडून बेसुमार उत्खनन केले जात आहे. केळघर घाटामध्ये भुस्खलनाची भितीदायक परिस्थिती असून ही डोंगर उकरण्याचा धंदा ठेकेदार कंपनीचा सुरु आहे. तत्कालीन जावली तहसिलदार व परिवेक्षाधीन जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांनी मुजोर ठेरेदार कंपनीच्या खडी क्रेशरवर कारवाई केली होती.
जावली तहसिलदारांनी रस्त्याच्या कामामधील बेसुमार उत्खननाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला रायल्टीबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ठेकेदार कंपनीचे उखळ पांढरे करण्याच्या प्रयत्नात जावली तहसिलदारांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. जावली तहसिलदाराच्या हद्दीमध्ये दुसरीकडे कासची रायल्टी उरमोडी बांधकाम अभियत्यानकडून चोख भरुन कामामध्ये पारदर्शकता ठेवली जात आहे. उरमोडी धरण विभागाकडून 363.53 लक्ष रायल्टी महसूल विभागाकडे कास धरणाच्या उंची वाढवण्यासाठी जमा होतात. मात्र महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याच्या कामामध्ये ठेकेदार कंपनीकडून चुना लावण्याचा उद्योग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियत्यांसह सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
जावली तहसिलदारांनी रायल्टी भरण्यास टाळटाळ करणाऱया ठेकेदार कंपनीविरोधात गुन्हा दाखल कारावा. थकीत रॉयल्टी लवकरात लवकर भरुन कारवाई करावी, अशी मागणी जावली तालुक्यातील नागरिकांमधून होवू लागली आहे.