ऑनलाईन टीम / सातारा :
संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाली असून, काही जागांचे निकाल हाती आले आहेत. जावली तालुका सोसायटी मतदार संघात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे एका मताने विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
या निवडणुकीत एकूण 49 मतांपैकी रांजणे यांना 25 तर शिंदे यांना 24 मते मिळाली.