नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या जाहीर प्रचारासंबंधी निर्णय घेण्यासाठी आज सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक येथे होणार आहे. या पाच राज्यांमध्ये जाहीर सभा, रोड शो, तसेच इतर प्रकारच्या जाहीर प्रचाराला अनुमती द्यायची की नाही याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. सध्या कोरोना परिस्थितीमुळे जाहीर प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे.
तथापि, गेल्या आठवडय़ात काही नियम शिथील करण्यात आले होते. घरोघरी जाऊन प्रचारासाठी जाणाऱया गटांमध्ये 10 जणांचा समावेश करण्याची मुभा देण्यात आली होती. त्याचप्रमाणे निवडणूक सभा घेण्यासाठी निवडल्या गेलेल्या मैदानांमध्ये जास्तीत जास्त 500 किंवा मैदानाच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना जमण्यासाठी अनुमती देण्यात आली होती. आता आज सोमवारच्या बैठकीत आयोग कोणती भूमीका घेतो याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे. अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नसल्याने प्रचारावरील सर्व बंधने काढून घेतली जाण्याची शक्यता नाही. आणखी काही नियम शिथील केले जाऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे.