नवी दिल्ली
रिलायन्स जिओने नवीन मेड इन इंडिया मोबाईल ब्राउझर जिओ पेजेस सादर केले आहे. सदर ब्राउझर तब्बल आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यामध्ये वैयक्तिक माहिती सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केले असल्याचेही सांगितले आहे.
गुगल प्ले स्टोअरवर ब्राउझरची ही नवी आवृत्ती आली आहे. जिओ पेजेस संपूर्णपणे भारतातच डिझाइन आणि विकसित केले आहे.
विविध भाषांमध्ये सेवा उपलब्ध
इंग्रजीसोबत हिंदी, मराठी, तामिळ, गुजराती, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषांमध्ये हे ब्राउझर कार्यरत करण्यात आले आहे.