रिलायन्सची वाटचाल कर्जमुक्तीकडे : डिजिटल क्रांतीची वाटचाल आणखी सुखद
वृत्तसंस्था / मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफार्म लिमिटेडमधील गुंतवणुकीचा ओघ सुरुच आहे. यामध्ये कमी कालावधीत रविवारी जिओसोबत अबुधाबी इन्वेस्टमेंट ऍथोरिटी (एडीआयए) कंपनी 5,683.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन 1.16 टक्के हिस्सेदारी विकत घेणार आहे. ही गुंतवणूक 4.91 लाख कोटी रुपये इक्विटी मूल्य आणि 5.16 लाख कोटी रुपयांच्या एंटरप्राईज मूल्यावर गेली आहे. या एकूण व्यवहारासोबत जिओमध्ये तर 50 दिवसांमध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
सिल्वर लेकने शुक्रवारी शेवटची 4 हजारहून अधिक कोटीची अतिरीक्त गुंतवणूक केली होती. या व्यवहारासोबत सिल्वरलेकने दुसऱयांदा गुंतवणूक केली असून एकूण 10,202.55 कोटी रुपयांची गुंतवणूक जिओ प्लॅटफार्ममध्ये केली आहे. शुक्रवारी दोन गुंतवणूकदार मिळाले होते. यातील मुबादला कंपनीने 9,039 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
ध्येय रिलायन्सचे
रिलायन्स इंडस्ट्रीजने संभावित असणाऱया सार्वजनिक आयपीओच्या अगोदरच जिओ प्लॅटफॉर्ममधील 21 टक्क्मयांची हिस्सेदारी विकण्याचे ध्येय पूर्ण केले आहे. जिओकडे 38.8 कोटी मोबाईल ग्राहक आहेत. त्यांच्या मदतीने रिलायन्स आगामी काळात आपला डिजिटल विस्तार करण्यावर भर देणार असल्याचे संकेत सदरच्या प्रवासावरुन निश्चित होत असल्याचे दिसून येत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. यामुळे मार्च 2021 पर्यंत कंपनी कर्जमुक्त करण्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये 53,125 कोटी रुपयांचे राईट इश्यूच्या माध्यमातून यशस्वी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विश्वासाचे प्रतिक : मुकेश अंबानी
गुंतवणुकीमुळे मागील चार दशकातील यश प्राप्तीच्या प्रवासाला प्रारंभ झाला आहे. या प्रवासात एडीआयची भागीदारी ही विश्वासाचे प्रतिक असल्याचे मी मानतो.
भारतात जिओ डिजिटल क्रांतीत सर्वोच्च : कार्यकारी संचालक हमाद शाहवान अल्दहेरी
बाजारपेठेतील एका अग्रेसर जिओ कंपनीत केलेली गुंतवणूक ही आमच्यासाठी संधी आहे. आम्ही योग्य निर्णय घेतला असून आम्हाला गर्व वाटत आहे. कारण भारतामधील डिजिटल क्रांतीत जिओ सर्वोच्च स्थान पटकावत आहे.