केकेआर 11,367 कोटींची गुंतवणूक करणार : जिओला अमेरिकन कंपन्यांची पसंती
वृत्तसंस्था/ मुंबई
कोविड 19च्या वाढत्या संसर्गामुळे जगासह देशभरात विविध उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. दुसऱया बाजूला काहीजण नियम अटींच्या पालनासोबत आपले व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. या घडामोडीमध्ये देशातील रिलायन्स इंडस्ट्रीजमधील(आरआयएल) जिओ प्लॅटफॉर्ममधील गुंतवणुकीचा ओघ मात्र वाढतानाच दिसतो आहे. शुक्रवारी केकेआर या अमेरिकन कंपनीने 11 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केलीय.
मागील महिनाभरात जिओ प्लॅटफॉर्ममध्ये चार कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे तर आता अमेरिकेतील खासगी इक्विटी कंपनी केकेआरने शुक्रवारी 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. या अगोदर फेसबुक, सिल्वरलेक, विस्टा पार्टनर्स आणि जनरल अटलांटिक यांनी आपली गुंतवणूक जिओमध्ये करत काही प्रमाणातील हिस्सा विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत जिओमधील गुंतवणुकीला पसंती दाखवलेल्या कंपन्यांमध्ये सर्व अमेरिकन कंपन्या राहिल्या आहेत. यामुळे उद्योsग क्षेत्रात जिओ अमेरिकेच्या पसंतीला पडला असल्याची चर्चा जोरदारपणे सुरु असल्याचे पहावयास मिळत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
डिजिटल प्रवासात केकेआर : मुकेश अंबानी , रिलायन्सचे अध्यक्ष
भारतीय डिजिटल प्रणालीत काळानुसार बदल करण्याच्या आमच्या प्रवासात केकेआर सहसोबती म्हणून आमच्याबरोबर येत आहे, हे सर्व भारतीयांसाठी आगामी काळासाठी फायदेशीर ठरणारे आहे.
जिओ स्वदेशी प्लॅटफॉर्म : हेनरी क्रॅविस, सह संस्थापक
खरचं आम्ही जिओप्लॅटफॉर्मला आज स्वदेशी प्लॅटफॉर्म म्हणूनच पाहत आहोत. देशामध्ये डिजिटल क्रांती घडून तंत्रज्ञानाच्या जेरावर देशाला जागितक पातळीवर सक्षम बनविण्याचा हा प्रयत्न आहे. मजबूत नेतृत्व गुणामुळे आम्ही जिओमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिओमधील आतापर्यंतची गुंतवणूक
कंपनी गुंतवणूक हिस्सेदारी
(कोटीमध्ये) (टक्के)
फेसबुक………. 43,574……. 9.99
सिल्वर लेक…… 5,656……. 1.15
विस्टा इक्विटी.. 11,367……. 2.32
जनरल अटलांटिक 6,598….. 1.34
केकेआर………. 11,367……. 2.32
एकूण 78,562 17.12
केकेआरची वाटचाल
केकेआरची 1976 मधील स्थापना झाली असून कंपनी जागतिक खासगी उद्योगांमध्ये गुंतवणूक करत आली आहे. कंपनीने खासगी इक्विटी आणि टेक्नॉलॉजी ग्रोथ फंडाच्या आधारे बीएमसी सॉफ्टवेअर, बाइटडांस आणि गोजेक सह अन्य तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. केकेआरने आतापर्यंत 30 अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे.