वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिया यांचे समभाग शुक्रवारी तब्बल 10 टक्क्यांनी वधारुन 13.53 रुपयांवर पोहोचले आहेत. हा यांचा 52 आठवडय़ातील उच्चांक राहिला आहे. बाजारातील घसरणीच्या काळातही कंपनीच्या समभागात तेजी राहिली आहे. दुपारी साडेबाराच्या दरम्यान 7.72 टक्क्यांच्या तेजीसोबत समभाग 13.20 रुपयावर ट्रेडिंग राहिले आहे.
मागील तीन महिन्यात व्होडाफोन-आयडियाचे समभाग 69 टक्क्यांनी तेजीत राहिले असून याचदम्यान बेंचमार्क निर्देशांकामध्ये 24 टक्क्यांची तेजी राहिली आहे. यावेळी मात्र स्पर्धेतील भारती एअरटेल कंपनीच्या समभागानी 50 टक्क्यांची तेजी प्राप्त केली आहे. तसेच जिओची मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 11 टक्क्यांनी घसरले आहेत.
फंड मिळण्याचे संकेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काही दिवसांमध्ये व्होडाफोन-आयडिया कंपनीला मोठा फंड मिळण्याचे संकेत आहेत. गुंतवणूकदारांसोबत यासंदर्भात अंतिम चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. यामध्ये अमेयिकेची पीइ कसोर्शियम कंपनीमध्ये 15,000 कोटी रुपयांचे फंडिग करणार असून या व्यवहारासाठी चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. कंपनीवर कर्ज असून मागील सलग 9 तिमाहीत कंपनीला तोटा सहन करावा लागल्याची माहिती आहे. यामुळे सदरच्या फंडिंगमुळे काही प्रमाणात स्थिती सुधारण्याचे संकेत अभ्यासक व्यक्त करत आहेत.