नवी दिल्ली
रिलायन्स जिओकडून 17 जूनपासून (आजपासून) नवीन कनेक्शनसाठी इन्स्टॉलेशन शुल्कसाठी विना पोस्टपेड ब्रॉडब्रँड सेवा देण्यात येणार आहे. कंपनीकडून सध्या नवीन कनेक्शनसाठी 1,500 रुपये इन्स्टॉलेशन शुल्क घेतले जाते, अशी माहिती कंपनीच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.
कंपनी फायबर ग्राहकांसाठी एकाचवेळी विविध नवीन पोस्टपेड योजना देणार आहे. सदरची योजना 399 रुपये प्रतिमहिन्याच्या किमतीमध्ये सुरु होणार आहे. नवीन योजना सुरु करण्याच्या घोषणेसोबत सर्व नवीन वापरकर्त्यांना योजनांसाठी सोबत इंटरनेट बॉक्स व राउटर मोफत मिळणार असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार मोफत इंटरनेट बॉक्स आणि मोफत इन्स्टॉलेशनचा फायदा वापरकर्त्यांना तेव्हाच होणार आहे, जेव्हा ते कमीत कमी सहा महिन्याच्या वॉरंटीची योजना खरेदी करु शकतील.
रिलायन्स जिओची नवी योजना
रिलायन्स जिओची नवी पोस्टपेड योजना ही एक विशेष योजना असून यामध्ये अपलोड आणि डाऊनलोड स्पीड एकसारखेच मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना 399 च्या प्लॅनमध्ये 30 एमबी, 699 रुपयांना 100 एमबी, 999 रुपयाना 150 एमबी आणि 1499 रुपयांमध्ये 300 एमबीचा प्लॅन मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.