बेळगाव :/ प्रतिनिधी
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम हाती घेत आहे. संसर्ग वाढू नय् यासाठी सर्व वाहतूकव्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तरीदेखील शहरात अनावश्यक वाहने फिरताना दिसत आहेत. अशा वाहनधारकांची शनिवारी जिजामाता चौकमध्ये पोलिसांनी कसून चौकशी केली. तर अनावश्यक फिरणाऱयांना माघारी पाठविले.
जिल्हय़ात कोरोनाबाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील सर्व गल्ली बोळातील रस्ते बॅरीकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शनिवारी पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱया वाहनधारकांना अडवून समज दिली.