ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अनेक ठिकाणी अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच अभ्यासावर होत असून अनेकजण परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. यामध्ये एमपीएससीच्या उमेदवारांचाही समावेश आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एमपीएससी सह सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये #muhs #muhsexam #muhsexampostpone वापरला आहे.
तसेच सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, या महिन्यात होणारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात यावी , याबाबद्दल सुद्धा तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अशा आशयाचे दुसरे ट्विटदेखील त्यांनी केले आहे.
दरम्यान 11 एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.