प्रतिनिधी/ बेळगाव
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशनच्या राष्ट्रीय महिला कार्यकारिणीमध्ये भारती हरदी यांची निवड झाली आहे. जितोच्या महिला कार्यकारिणीवर एकूण 24 सदस्य असून, संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. जितो ही जैन समाजाची मोठी संघटना असून त्यामध्ये जैन दिगंबर, श्वेतांबर, मंदिरमार्गी व स्थानउवासी यांचा समावेश आहे. सर्व जैन समाजाला एकाच छताखाली आणणारी ही संस्था असून, समाजबांधवांसाठी अनेक सामाजीक कार्यक्रम राबविणे संस्थेच्या भारतात 67 तर परदेशात एकूण 11 शाखा आहेत.
महिला विभागातर्फे व्यावसायिक कार्यशाळा व्यवसाय प्रशिक्षण, प्रदर्शन, संगणक प्रशिक्षण, बँकिंग, लाईफस्टाईल, मॅनेजमेंट, शैक्षणिक टूर, वधूवर मेळावा, योगा, स्पोर्ट्स, पाककला, स्कॉलरशिप, अल्पसंख्यांकासाठीच्या सरकारच्या योजना, महिला सक्षमिकरण सेवा यांवर कार्यक्रम राबविले जातात.
जितेच्या महिला विभागातर्फे पूर व करोनाकाळात मोठय़ा प्रमाणात रेशन वाटप व इतर कामे झाली आहेत. भारती हरदी यांची राष्ट्रीय पातळीवर झालेली निवड ही बेळगावच्या जितो महिला शाखेच्या अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या कामाची पोचपावतीच आहे.